काळापैसाधारकांनी ३० सप्टेंबपर्यंत आपल्याकडील काळापैशांबाबतचा तपशील जाहीर करावा, अन्यथा कारावासासह कठोर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला. जडजवाहिर आणि रिअल इस्टेटच्या स्वरूपात अनेकांकडे काळा पैसा आहे, त्यांनी त्याबाबतची माहिती जाहीर करावी आणि सुखाची झोप घ्यावी, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी यांचा सत्कार करण्यासाठी सराफांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोक सराफाकडे खंडीभपर पैसा घेऊन जातात याची आपल्याला कल्पना आहे, अशा लोकांना संपत्ती जाहीर करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे, यापूर्वी ज्यांनी कर चुकविला आहे त्यांना कारागृहाचती हवा खावी लागली आहे, त्यामुळे ३० सप्टेंबरनंतर सरकारवर त्याच प्रकारची पावले उचलण्याची वेळ आणू नका, असेही मोदी म्हणाले.

Crime General Image
ऑनलाइन खेळाचं व्यसन लागलं; आयुर्विम्याचे ५० लाख मिळविण्यासाठी मुलाने केला आईचा खून
Jarange Patil accused the government of conspiracy against the movement
आंदोलनाविरुद्ध सरकारचे षड्यंत्र, जरांगे यांचा आरोप; रविवारी समाजबांधवांची बैठक
Pet dog bites young man crime against woman
पिंपरी : पाळीव श्वानाचा तरुणाला चावा, महिलेविरोधात गुन्हा
farmers protest delhi
Farmers Protest: शेतकऱ्यांचा मोदी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले, “सकारात्मक पाऊल उचललं नाही, तर २१ तारखेला…!”

ल्ल काळापैसाधारकांविरुद्ध ३० सप्टेंबरनंतर कारवाई करावी लागेल हे पाप आपल्याला करावयास भाग पाडू नका, १ जून रोजी मिळकत घोषणा योजना लागू करण्यात आली असून काळापैसाधारकांनी ३० सप्टेंबपर्यंत संपत्ती जाहीर करून आणि कर आणि दंड भरून मोकळे व्हावे, या संधीचा जे लाभ घेणार नाही त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.