हैदराबादमधील दिलसुखनगर भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटांप्रकरणी सोमवारी पोलिसांनी रांचीतून एकाला अटक केली. मंजर इमाम असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक विपुल शुक्ला यांनी ही माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून शुक्लाचा शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी दोन वेळेला रांचीमध्ये छापे टाकले होते. गेल्या २१ फेब्रुवारीला हैदराबादमध्ये झालेल्या स्फोटात १६ जणांचा जीव गेला होता. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मुंबई आणि पुण्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारीही एनआयएच्या अधिकाऱयांना तपासात मदत करीत आहेत.