फ्रान्समधील रोऑनमधल्या चर्चमध्ये दोन शस्त्रधारकांनी काही लोकांना बंधक बनवले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत हल्लेखोरांना कंठस्थान घातले.दोन हल्लेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून चार ते सहा जणांना चर्चेमध्ये ओलीस ठेवले होते. यात नन्सचाही समावेश होता. याबद्दल माहिती कळताच पोलीस तातडीने दाखल झाले आणि या हल्लेखोरांना कंठस्नान घातले. परंतु, हे हल्लेखोर कोण होते हे अद्याप कळू शकले नाही. यात ओलीस ठेवलेल्या एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. तर एकाची प्रकृती ही गंभीर आहे. पोलिसांनी चर्च परिसराचा ताबा घेतला आहे. तसेच या परिसराचे फोटो न काढण्याच्या सूचनादेखील पोलिसांनी दिल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो अपलोड करून भितीचे वातावरण तयार न करण्याच्या सूचना फ्रान्स पोलिसांनी दिल्या आहेत.
फ्रान्समध्ये आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. १४ तारखेला फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनीही नाइसमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यात ८४ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये तीन महिन्यांची आपत्कालीनस्थिती जाहीर करण्यात आली होती.