मुंबईतील २००८ मध्ये झालेला हल्ला हे शूर हुतात्म्यांचे कृत्य होते, तर पुण्यात जर्मन बेकरीवर केलेला हल्ला हा सुंदर बॉम्बहल्ला होता, असे अमेरिकेच्या नेव्ही सील्सना अबोटाबाद येथे लादेनला ठार केलेल्या ठिकाणी सापडलेल्या कागदपत्रांत म्हटले आहे.
या १५ पानी इंग्रजी कागदपत्रांत म्हटले आहे की, मुंबई हल्ला हा आशीर्वादप्राप्त हल्ला होता. ब्रिटन, जर्मनी, भारत येथील अमेरिकी व मित्र देशांच्या ठिकाणांना उडवून दिले पाहिजे. अमेरिकेच्या आर्थिक केंद्रांना नष्ट करणे हे मुजाहिदिनांचे कामच आहे. लंडन बॉम्बहल्ल्यानंतर अमेरिका व युरोपच्या, इंडोनेशिया, पाकिस्तान, इजिप्त व भारतातील लक्ष्यांवर आम्ही हल्ले केले. मुंबईतला हल्ला करणारे शूर हुतात्मे होते.
त्यानंतर २०१०मध्ये पुण्यात जर्मन बेकरीवरील हल्ला छान व मोठा होता. तेथे ज्यू लोक येत असत व पाश्चिमात्य लोकही येत असत. मुंबई हल्ल्यानंतर दोन वर्षांनी हा हल्ला झाला होता, त्याचेही गुणगान या कागदपत्रांत आहे.