दहशतवाद तज्ज्ञ ल्युसी रिचर्डसन यांची ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिचर्डसन या हार्वर्डमध्ये अध्यापक होत्या व सध्या स्कॉटलंडच्या सेंट अँड्रय़ूज विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या. इस. १२३० पासून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रथमच महिलेस नेमण्यात आले आहे.
कुलपती असलेले ख्रिस पॅटन यांनी सांगितले, की ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शैक्षणिक मूल्यांबाबत प्रा. रिचर्डसन यांनी वचनबद्धता दाखवली असून शिक्षण क्षेत्रातील त्यांची कामगिरी मोलाची आहे व त्याचा येत्या वर्षांमध्ये त्यांच्या अनुभवाचा विद्यापीठाला फायदा होईल. त्यांच्या नियुक्तीवर अजून विद्यापीठाच्या पाच हजार सदस्यांच्या मंडळाचे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. रिचर्डसन यांचा जन्म आर्यलडमध्ये झाला आहे.