भारताचे पाकिस्तानमधील दूतावासातील अधिकारी सूरजीत सिंह यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरीचा ठपका ठेवला आहे. सूरजीत सिंह यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सूरजीत यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत.

भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी महमूद अख्तरला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे विभागाने ताब्यात घेतले होते. हेरगिरीच्या आरोपावरुन अख्तरला ताब्यात घेण्यात आले होते. अख्तरला सहाय्य करणाऱ्या त्याच्या दोन भारतीय साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अख्तरच्या या दोन्ही सहकाऱ्यांना दिल्लीतील न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र अख्तर दूतावासातील अधिकारी असल्याने त्याला अटक करणे पोलिसांना शक्य झाले नाही. त्यामुळेच त्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारताने महमूद अख्तरवर केलेली कारवाई पाकिस्तानने सूरजीत सिंह यांच्यावर केली आहे. पाकिस्तानकडून सूरजीत यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. हेरगिरीच्या आरोपाचा आधार घेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सूरजीत यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत.