पाकिस्तानी सैनिकाकडून ऐवज जप्त

पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमच्या (बॅट) ज्या पथकाने पूंछ जिल्ह्य़ात नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला, ते विशेष दलांच्या सैनिकांची निवड करून तयार करण्यात आले होते, तसेच त्यांच्याजवळ खास प्रकारचे खंजीर आणि या हल्ल्याचे रेकॉर्डिग करण्यासाठी हेडबॅण्ड कॅमेरे होते.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Kevin Pietersen Shares Experience of flight while Iran Attacks Israel
IPL 2024: इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत केविन पीटरसनची पोस्ट चर्चेत; अनुभव मांडताना म्हणाला, “त्यांची क्षेपणास्त्रं चुकवण्यासाठी…”
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Indian Navy
भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांच्या तावडीतून २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका

२२ जूनला झालेल्या या हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद झाले तर भारताच्या प्रत्युत्तरात ‘बॅट’चा एक जण मारला गेला. घटनास्थळ निर्धोक करण्यासाठी लष्कराच्या पथकांनी राबवलेल्या शोधमोहिमेत त्यांना ‘बॅट’च्या सैनिकाचा मृतदेह सापडला. मृतदेह स्थानिक पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी शस्त्रे, दारूगोळा तसेच इतर युद्धजन्य साहित्य सापडले. त्यात एक खास प्रकारचा खंजीर, कॅमेऱ्यासह हेडबॅण्ड, चाकू, १ एके रायफल, २ मॅगनिझन, २ ग्रेनेड इ. साहित्य सापडले असून यावरून पाकिस्तानी लष्कराच्या पाशवी मानसिकतेची कल्पना येते, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. खास प्रकारचा खंजीर व चाकू ही शस्त्रे अवयव छाटण्यासाठी, तसेच गोळीबारात मारल्या गेलेल्या जवानांचा शिरच्छेद करण्यासाठी होती, मात्र भारतीय सैनिकांच्या तत्काळ कारवाईमुळे हा प्रयत्न उधळला गेला. ‘बॅट’च्या सदस्याने ही कारवाई रेकॉर्ड करण्यासाठी आणि जवानांचे शरीर विकृत करण्यासाठी त्याच्या डोक्यावर कॅमेरा असलेला हेडबॅण्ड घातला होता, मात्र आपल्या जवानांनी त्यांच्यापैकी एकाला ठार मारून हा प्रकार थांबवला, असे अधिकारी म्हणाला. या कॅमेरा सीमेपलीकडील पाकिस्तानी लष्कराच्या यंत्रणेशी थेट जोडला होता काय, हा तपासाचा विषय असून कॅमेऱ्यातील डेटा व इतर माहितीचे विश्लेषण करण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.