भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाझ शरीफ यांच्या रशियातील चर्चेत ठरल्याप्रमाणे सदिच्छा म्हणून पाकिस्तानने १६३ भारतीय मच्छिमारांना मुक्त केले आहे.
सुटका करण्यात आलेल्यांत ११ वर्षांच्या एका मुलाचा व १६२ प्रौढांचा समावेश आहे. त्यांना वाघा सीमेवर आणून भारताच्या हवाली करण्यात आले.
दोन्ही देशांनी एकमेकांच्या मच्छिमारांना बोटींसह पंधरा दिवसात सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानातील तुरुंगात भारताचे ३५५ मच्छिमार असून भारताच्या तुरुंगात पाकिस्तानचे २७ मच्छिमार आहेत.