पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा शरीफ यांच्या मुलांना इशारा

पनामा पेपर्स प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकासमोर बनावट दस्तऐवज सादर करण्यात आला असल्याचे सिद्ध झाल्यास पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलांना सात वर्षांच्या कारावसाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Pakistan former Prime Minister Imran Khan
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा, १४ वर्षांच्या शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

पनामा पेपर्स प्रकरणाची सुनावणी सोमवारी सुरू झाली, गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) त्याप्रकरणी १० जुलै रोजी आपला अहवाल सादर केला.

शरीफ यांच्या मुलांनी बनावट दस्तऐवज सादर केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा गुरुवारी न्यायाधीशांच्या तीन सदस्यांच्या पथकाने दिला आहे. शरीफ यांच्या मुलांनी सादर केलेल्या दस्तऐवजात फेरफार करण्यात आल्याचे जेआयटीने म्हटले आहे.

नवाझ शरीफ यांची कन्या मरियम यांनी सादर केलेले ‘ट्रस्ट डीड’ हे कॅलिब्री फॉण्टमध्ये आहे, मात्र हा फॉण्ट २००७ पर्यंत वाणिज्यिकदृष्टय़ा उपलब्ध नव्हता. लंडनमध्ये हे डीड शनिवारी नोटरी करण्यात आले, मात्र शनिवारी अधिकृतरीत्या सुटीचा दिवस असतो, त्यामुळे दस्तऐवजाच्या वैधतेबद्दल शंका व्यक्त करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे हुसेन नवाझ यांनी गल्फ स्टील मिल्सचा दस्तऐवज सादर केला तो बनावट असून त्या दस्तऐवजाची नोंदच नसल्याचे दुबई सरकारने म्हटले आहे. आपण माध्यमांकडे धाव घेतली असून सादर केलेल्या दस्तऐवजावर माध्यमांमध्येच चर्चा झाली आहे, असे न्या. सईद यांनी शरीफ यांच्या मुलांचे वकील सलमान अक्रम राजा यांना फटकारले आहे.