पाकिस्तानमध्ये नुकतीच एखाद्या चित्रपटात शोभेल अशी चक्रावून टाकणारी एक घटना समोर आली. पाकिस्तानमधील एका व्यक्तीने केंद्रीय मंत्री असल्याचे सांगत सरकारी अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात तब्बल सहा वर्षे धुळफेक केली. सलामत अली चौहान असे नाव असणाऱ्या या व्यक्तीचा हा प्रताप नुकताच केंद्रीय तपास संस्थेने (एफआयए) उघडकीस आणला. सध्या एफआयएने या व्यक्तीला तपासासाठी अज्ञातस्थळी नेल्याचे वृत्त ‘पाकिस्तान टाईम्स’ने दिले आहे. सलामत अली चौहान लोकांना मदतीची खोटी आश्वासने देत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र, दरम्यानच्या काळात त्याने मदत करण्याच्या बहाण्याने लोकांकडून कोट्यावधी रूपयांची माया गोळा केली होती. विशेष म्हणजे आपण मदत करत आहोत हे दाखविण्यासाठी त्याने पंतप्रधान कार्यालय आणि पाकिस्तानी अर्थमंत्रालयासोबत अनेकदा पत्रव्यवहारही केला होता. काही दिवसांपूर्वी चौहानने लाहोरच्या जिल्हा समन्वयक अधिकाऱ्याकडे (डीसीओ) स्वत:ला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर डीसीओकडून यासंबंधी पोलिसांना कळविण्यात आले होते. एफआयएने दिलेल्या माहितीनुसार, खोटी ओळख सांगून त्याने अनेक लोकांशी व्यवहार केले होते. कहर म्हणजे त्याने लाहोरच्या चंबा हाऊसमध्ये स्वत:साठी कर्मचारी, कार्यालय आणि वाहनाचीही मागणी केली होती. सहा वर्षांच्या काळात त्याने अनेक सरकारी सुविधांचाही फायदा घेतला. मात्र, या काळात कोणीही त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला नाही.

याशिवाय, केंद्रीय मंत्री म्हणून तयार केलेल्या बनावट फेसबूक पेजवर त्याने स्वत:ची माहिती देताना आपण आर्थिक आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयात रीबा फ्री तंत्रज्ञानाचा सल्लागार असल्याचे सांगितले आहे. थक्क करणारी बाब म्हणजे गेल्या सहा वर्षात सरकारी यंत्रणेला याचा कुठलाच थांगपत्ता लागला नाही.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Cyber Crime
कंबोडियात पाच हजार भारतीयांवर सायबर अत्याचार, ५०० कोटींची फसवणूक, सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात!
Mohammad Muizzu
सैनिक नकोत पण कर्जमाफी हवी; मैत्रीचा हवाला देत मालदीवची भारताकडे याचना