कोणत्याही अटी न लादता इस्रायल वाटाघाटीच्या टेबलावर येत नाही तोपर्यंत आपण शस्त्रसंधी स्वीकारणार नसल्याची धमकी पॅलेस्टिनींनी दिल्यानंतर इस्रायलच्या जेट विमानांनी किनारी पट्टय़ावर मोठय़ा प्रमाणावर हल्ला चढविला. यामुळे गाझा पट्टीतील रक्तपात सुरूच असून आतापर्यंत दोन हजार लोक ठार झाले आहेत.
उभयपक्षी तोडगा काढण्यासाठी कैरो येथे प्रयत्न सुरू असताना इस्रायलने पूर्वअटी घातल्या तर आपण येथून निघून जाऊ, असे पॅलेस्टिनींच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. इजिप्तच्या मध्यस्थांकडे आम्ही आठवडय़ापूर्वीच आमच्या मागण्या मांडल्या आहेत. परंतु आम्हाला अद्याप अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही, असे पॅलेस्टिनी शिष्टमंडळाचे सदस्य इझ्झात अल रिशेक यांनी सांगितले; तर पॅलेस्टिनी दहशतवादी सीमेपलीकडून अग्निबाणांचे हल्ले थांबवीत नाहीत तोपर्यंत आम्ही चर्चेसाठी येणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.