फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल नेटवर्किंगचा वापर अश्लील पाहण्यासाठी, वाचण्यासाठी होत असून हे रोखण्यासाठी १८ वर्षे वयाखालील मुलांना मोबाइल व संगणकाचा वापरच करू द्यायचा नाही, असा निर्णय खाप पंचायतीने घेतला आहे. मूल पौगंडावस्थेत असतानाच अशी सोशल नेटवर्किंग उपकरणे हाती पडणे समाजासाठी धोकादायक आहे. मोबाइलच्या माध्यमातून फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरले जाते. मुले त्यावर अश्लील पाहतात किंवा वाचतात. त्यामुळे १८ वर्षांचे होईपर्यंत मुलांच्या हाती मोबाइल द्यायचा नाही, असा निर्णय पंचायतीने घेतला आहे.