मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
किरकोळ क्षेत्रात एफडीआय आणण्याचा केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात विरोधी पक्षाने आज (सोमवार) पुन्हा एकदा प्रश्नोत्तराच्या तासात गोंधळ घातला परिणामी संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. त्याआधी अध्यक्षांवर दोन वेळा कामकाज स्थगित करावे लागले होते.
आज सकाळी संसदेचं कामकाज सुरू झाल्यावर लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप लोकांना आणि जवानांना श्रध्दांजली वाहिली.
एफडीआयचा निर्णय मागे घ्या, अशी नारेबाजी भाजप खासदारांनी सुरू केल्यानंतर, घरगुती गॅस सिलिंडरवर सबसिडीची मागणी करीत तृणमूल कॉंग्रेसचेही खासदार त्यामध्ये सामील झाले. तर आंध्र प्रदेशचे काही खासदार तेलंगणाच्या मागणीसाठी घोषणा देऊ लागल्यानंतर संसदेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.
दरम्यान, राज्यसभेतही मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर भाजप नेते व्यैकय्या नायडू यांनी एफडीआयचा मुद्दा उपस्थित केला आणि इतर पक्षांच्या खासदारांनीही त्यात सूर मिसळायला सुरूवात केली.
नायडू म्हणाले, प्रश्नोत्तराचा तास रद्द करून एफडीआयवर चर्चा करण्यासाठी आम्ही निवेदन दिले आहे. बसपा आणि सपाच्या खासदारांनीही एफडीआयच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अध्यक्ष हमीद अंसारी यांनी संसदेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं
दुपारी १२ वाजता दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरु झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.




















काँग्रेसचा जनाधार आणि सरकारची विश्वासार्हता झपाट्याने घटत चाललेला असल्याने भाजप सहित अन्य विरोधी पक्ष सरकारला साथ देऊन त्यांच्या कोणत्याही पापाचे भागीदार होऊ इच्छित नाहीत हे यावरून सिद्ध होते.