ट्रॅफिक जॅममध्ये फसल्यानंतर Paytm चे विजय सीईओ शेखर शर्मा यांनी गुरुवारी सायकल रिक्षामधून प्रवास केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेण्यासाठी ते आले होते. अखिलेश यांनी स्वत: ही माहिती आपल्या ट्विटर खात्यावरून दिली आहे. ट्रॅफिक जॅममुळे Paytm चे सीईओ विजय शेखर शर्मा यांना सायकल रिक्षामधून येथे यावे लागले. लखनऊ मेट्रो ट्रॅफिक जॅमच्या समस्येपासून दिलासा देईल. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्य सरकारतर्फे देण्यात येणारे यश भारती पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी शर्मा गुरुवारी लखनऊमध्ये आले होते.

लखनऊ मेट्रो हा अखिलेश शर्मा यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लखनऊमध्ये मेट्रो धावेल, अशी आशा अखिलेश बाळगून आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गुरुवारी साहित्य, चित्रपट, विज्ञान, पत्रकारिता, संस्कृती, संगीत, नाटक, क्रीडासह विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ७३ व्यक्तींना यश भारती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य, समाजसेवा, चिकित्सा, चित्रपट, विज्ञान, पत्रकारिता, शिल्पकला, संस्कृती, शिक्षण, संगीत, नाटक, खेल, उद्योग आणि ज्योतिष क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मागील सरकारने यश भारतीसह सर्व पुरस्कारांवर बंदी आणली होती. परंतु, सपा सरकारने पुन्हा सुरु केलेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यास मुलायम सिंग उपस्थित नव्हते.