राष्ट्रीय पक्षी असलेला मोर व राज्याचा प्राणी असलेला जंगली गवा यांना ‘उपद्रवी प्राणी’ जाहीर करण्याचा प्रस्ताव गोवा सरकारने मांडला आहे. काही राजकीय पक्षांनी या निर्णयावर टीका केली.
मडगाव येथे कृषी मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले की, आम्ही अनेक जंगली प्राण्यांना उपद्रवी जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, त्यात जंगली गवा, मोर यांचा समावेश आहे. हे प्राणी ग्रामीण भागात शेतातील उभ्या पिकाची नासाडी करतात त्यामुळे हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या असून पर्यावरणवाद्यांनी मोर व गवा यांना उपद्रवी घोषित करण्याच्या प्रस्तावावर नाराजी जाहीर केली. गवा हा धोक्याच्या प्रजातीतील आहे, त्यामुळे या प्राण्यांच्या अस्तित्वावरच गदा येईल असे त्यांचे म्हणणे आहे. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे व गवा हा राज्य प्राणी आहे याची आपल्याला जाणीव आहे, पण त्यांना धोकादायक जाहीर करणे काही बाबींचा विचार करता आवश्यक
आहे.
या प्राण्यांनी नुकसान केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत व या प्राण्यांना उपद्रवी जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अलीकडेच असे सांगितले होते की, माकडे व इतर काही प्राण्यांना उपद्रवी जाहीर केले जाईल. मंकी फिव्हर रोगाच्या घटनाही गोव्यात वाढल्या आहेत. शेतक ऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान प्राणी करीत आहेत.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
congress leader rahul gandhi slams pm modi over electoral bond issue
निवडणूक रोखे हा खंडणीचा प्रकार; राहुल गांधी यांची टीका
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन