पुढील महिन्यापासून देशातील काही शहरांमधील पोस्ट ऑफिसांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार आहे. पासपोर्ट प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी आणि पासपोर्ट कार्यालयांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

देशभरातील पासपोर्ट कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पासपोर्टसाठी अर्ज केले जात आहेत. त्यामुळेच देशातील पोस्ट कार्यालयांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सुविधा परराष्ट्र मंत्रालयाने उपलब्ध करुन दिली आहे. पोस्ट ऑफिसांमध्ये पासपोर्ट अर्ज करण्याची सुविधा पहिल्या टप्प्यात राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंडसह इतर काही राज्यांमध्ये उपलब्ध असणार आहे.

mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Changes in Joint Entrance Examination Main Exam Dates by National Examination Authority Pune news
‘जेईई मुख्य’च्या तारखांमध्ये बदल
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला
us clear stand on gaza ceasefire
गाझातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेची स्पष्ट भूमिका; नकाराधिकाराचा वापर टाळल्याने यूएनएससीमध्ये ठराव मंजूर, नेतान्याहूंचा अमेरिका दौरा रद्द

मार्च महिन्याच्या पूर्वार्धात देशभरातील शहरांमधील पोस्ट ऑफिसांमध्ये पासपोर्ट अर्ज दाखल करता येणार आहेत. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून जोरदार तयारी केले जाते आहे. सध्या देशभरात ८९ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. तर देशभरातील पासपोर्ट कार्यालयांची संख्या ३८ इतकी आहे. २०१६ मध्ये परराष्ट्र मंत्रालयाकडून १ कोटी १५ लोकांना पासपोर्ट देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

मार्च महिन्याच्या पूर्वार्धापासून देशातील अनेक राज्यांमधील पोस्ट ऑफिसांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज स्वीकारले जातील. राजस्थानमधील कोटा, जैसलमेर, बिकानेर, झुनझुनू येथील पोस्ट ऑफिसांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पश्चिम बंगालमधील असनसोल, नादिया, उत्तर दिनाजपूरमधील पोस्ट ऑफिसांमध्येही पासपोर्ट अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर झारखंडमधूल देवघर, जमशेदरपूरमधील पोस्ट ऑफिसांमध्येही पासपोर्ट अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

‘पहिल्या टप्प्यातील पोस्ट ऑफिसांमध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याची यंत्रणा उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे ट्विट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. जास्तीत जास्त लोकांना वेळेवर पासपोर्ट मिळावेत आणि लोकांना त्यांच्या जवळच्या भागात पासपोर्टसाठी अर्ज करता यावेत, यासाठी पोस्ट ऑफिसचा वापर करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.