देशभरातील पेट्रोलचे दर शनिवारी ५० पैशांनी कमी करण्यात आले तर डिझेलचा दर जैसे थे ठेवण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात पेट्रोलचे दर दोन रूपयांनी कमी करण्यात आल्यानंतर पेट्रोलच्या दरातील ही पहिलीच कपात आहे. मात्र, डिझेलच्या दरात कोणताही फरक पडलेला नाही. यापूर्वी ऑक्टोबर १६ रोजी ९५ पैसे आणि १ ऑक्टोबरला ५० पैशांनी डिझेलचे दर वाढविण्यात आले होते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती आणि रूपया-डॉलर विनिमय दरामुळे ग्राहकांना पेट्रोलच्या कमी झालेल्या किंमतीचा फायदा मिळणार असल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्यावतीने सांगण्यात आले.