देशात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरांत प्रति लिटरमागे ७४ पैशांनी तर डिझेलच्या दरांत प्रति लिटरमागे १.३० रुपयाने घट केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांत झालेली घसरण आणि रुपया व डॉलरच्या विनिमय दरांतील बदल यामुळे देशांतर्गत इंधनाच्या दरांत बदल केले जात असल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे जाहीर करण्यात आले. त्यानुसार दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्या आपल्या इंधन दरांत बदल करत असतात. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ससत वाढ होत होती. या पंधरवडय़ात मात्र त्याला छेद दिला जाऊन दर कमी केले जात आहेत.