पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबूक पेजसाठी वापरण्यात आलेल्या छायाचित्रावर उचलेगिरीचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेतील एका छायाचित्रकाराने धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबूकर पेजवर वापरण्यात आलेले छायाचित्र स्वत:चे असल्याचा दावा केला आहे. हे छायाचित्र वापरताना आपल्याला कोणतीही विचारणा झाली नव्हती किंवा या छायाचित्रांसोबत आपल्या नावाचा उल्लेखही नसल्याचा दावा बोस्टन येथील बिमल नेपाल यांनी केला आहे. बिमल नेपाल यांनी नॅशनल जिओग्राफी आणि हार्वर्ड मिडीया यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम केले आहे.

nar22

आपल्या मुळ छायाचित्रामध्ये फेरफार करून ते मोदी यांच्या फेसबूक पेजसाठी वापरण्यात आल्याचे बिमल नेपाल यांचे म्हणणे आहे. नरेंद्र मोदी यांच्या फेसबूक पेजवर माझे छायाचित्र वापरले जाणे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मात्र, त्यासाठीचे श्रेय न दिल्यामुळे नाराज असल्याचे बिमल यांनी फेसबूकच्या माध्यमातून सांगितले आहे.  
bimal1 

बिमल नेपाल यांचे मूळ छायाचित्र.