सत्तरच्या दशकातील मादक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केटी मिर्झा यांचे लंडनमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आठवडाभरापूर्वीच त्यांचे निधन झाले असून, हे वृत्त नुकतेच समोर आले आहे. शेवटच्या काही दिवसांमध्ये केटी सर्वांपासून पूर्णपणे अलिप्त होत्या.

सत्तरच्या दशकात ग्राफिक डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या केटी लंडनमधील हिलटन हॉटेल येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. त्यावेळीच प्लेबॉय क्लबच्या एका कर्मचाऱ्याने त्यांना पाहिले आणि ऑडिशनसाठी विचारले. केटी मिर्झा यांनी ती ऑडिशन देत १९७३ मध्ये प्लेबॉय ‘बनी’च्या रुपात या क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेत्री अंजून महेंद्रू आणि राबिया खान (अभिनेत्री जिया खानची आई) या केटी यांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आयकर विभागात वरच्या हुद्द्यावर कामाला असणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या घरी केटी मिर्झांचा जन्म झाला होता. कातिया म्हणजेच केटी यांचे कुटुंब त्यांच्या जन्मानंतर यूकेला स्थलांतरित झाले. त्यानंतरच्या कालावधीत प्रसिद्धी, ग्लॅमर या सर्वांमध्ये स्वारस्य असलेल्या केटी यांनी मुंबईची वाट धरली. बॉलिवूडमध्ये ‘कस्मे वादे’, ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून केटी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मिर्झा यांच्या वाट्याला फारसे यश आले नाही. पण, त्या काळात मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या केटी यांनी त्यांच्या मादक अदांनी अनेकांनाच घायाळ केले होते.