देशात महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही बाब अतिशय चिंताजनक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केले. पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांनी या गोष्टींची गंभीर दखल घेऊन या समस्येचे योग्य पद्धतीने निराकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण भागातील जनता मोठय़ा प्रमाणात शहरी भागांकडे वळत आहेत. समाजातील हा बदल योग्य पद्धतीने समजून हाताळला नाही, तर तणावाची परिस्थिती निर्माण होईल तसेच देशात अशांतता माजेल, असा इशारा त्यांनी दिला.
  सध्या मोठय़ा शहरांमध्ये महिला आणि मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, याकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली.