पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवरून अनेकदा नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात. मात्र, शुक्रवारी याच कारणामुळे नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी ट्विटरवर चांगलेच चर्चेत होते. नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अशरफ गनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, गनी यांनी आपला वाढदिवस आज नसल्याचे सांगत तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, असा संदेश ट्विटरवर लिहला. या मजेशीर प्रकाराची ट्विटरकरांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मोदींनी कोणत्या सुत्रांच्या माहितीनुसार अशरफ गनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, हे सिद्ध करण्यासाठी ट्विटरवर चढाओढ सुरु झाली. याशिवाय, ट्विटरकडांकडून अनेक मजेशीर सल्लेही मोदींनी देण्यात आले आहेत.