पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतर्कतेमुळे आज मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या सतर्कतेमुळे दूरदर्शन वाहिनेचे कॅमेरामनसहित अनेकांचे प्राण वाचले. गुजरात येथील जामनगर येथे एका जल प्रकल्पाच्या उदघाटनाच्या वेळी मोदी गेले होते. त्यावेळी चित्रिकरणासाठी माध्यमांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अजी धरणातून पाणी सोडले गेले. परंतु चित्रिकरणात मग्न असलेल्या दूरदर्शनचे कॅमेरामन संतोष शेजकर यांच्या ते पटकन लक्षात आले नाही. मागून पाण्याचा जोरदार प्रवाह येत होता. वर उभे असलेल्या मोदींची नजर त्यांच्यावर गेली, त्यामुळे प्रसंगावधानता दाखवत मोदींनी त्यांना तेथून तातडीने हटण्यास सांगितले. संतोष यांनी आपला कॅमेरा आणि ट्रायपॉड तेथेच ठेवून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मागून आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने त्यांचा कॅमेरा आणि ट्रायपॉड वाहून गेला. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात पाण्याचा वेग किती जास्त होता हे दिसून येत. नंतर वाहून गेलेला त्यांचा कॅमेरा बाहेर काढण्यात आला. जर मोदींनी वेळीच त्यांना सावध केले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.