पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास केला. एका कार्यक्रमाला जाण्यासाठी धौलाकुआ ते द्वारका असा प्रवास पंतप्रधानांनी केला.पंतप्रधान जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातात तेव्हा सुरक्षेच्या कारणासाठी तो मार्ग बंद ठेवल्याने लोकांची गैरसोय होते. त्यामुळे त्यांनी मेट्रोने प्रवास केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय गुप्तचर अकादमी (नॅशनल इंटलिजन्स अकादमी) च्या कार्यक्रमाला ते जात होते. मेट्रोचा प्रवास आनंददायी होता. श्रीधरन नेहमी दिल्ली मेट्रोचा अनुभव सांगायचे. मात्र आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असे मोदींनी ट्विट केले आहे. ई. श्रीधरन दिल्ली मेट्रोचे माजी प्रमुख आहेत.