भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धात  प्राणार्पण करणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
देशाच्या एकता व एकात्मतेचे रक्षण करताना या जवानांनी सर्व अडचणींवर मात करून विजय मिळवला, असे गौरवौद्गार त्यांनी काढले.
त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, १९६५ च्या युध्दाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यात मातृभूमीसाठी लढलेल्या शूर जवांनापुढे आपण नतमस्तक आहोत. त्यांच्या धैर्य व शौर्यामुळे नेहमीच प्रेरणा मिळत राहील. अडचणींवर मात करीत त्यांनी भारताच्या एकतेचे रक्षण केले. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचेही स्मरण त्यांनी केले. १९६५ च्या युद्धात शास्त्रींनी देशाला  खंबीर नेतृत्व दिले.  भारतीय सैन्यदलांनी जम्मू-काश्मीरमध्ये हाजीपीर खिंडीतील लढाई
जिंकली होती.