विषारी दारू प्यायल्यामुळे गया जिल्ह्य़ात सोमवारी आठ जणांचा बळी गेला आहे. बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या दारूमुळे विषबाधा होऊन गेल्या महिन्याभरात मरण पावलेल्यांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.
सोमवारी रामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारूमुळे सातजण मरण पावले तर चेरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. विषारी दारूमुळे प्रकृती बिघडलेल्या चार जणांना अनुगड नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक राकेश दुबे यांनी दिली. बिहारचे पोलीस महासंचालक अभयानंद यांनी मगध विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक नायर हुसैन यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.