प्रकाश आंबेडकरांचे दलित समाजाला आवाहन

आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने मोर्चे काढण्याचा हक्क राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच सर्वाना दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा हक्क असलेल्या मोच्र्याना विरोध म्हणून प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दलित समाजाला केले आहे.

bhiwandi lok sabha marathi news
भिवंडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काँग्रेसशी अजूनही सूर जुळेना
PM Modi and Jitendra awhad
“राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार…”, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा संताप; म्हणाले, “काँग्रेसच्या नावावर…”
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?

कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात सुरू झालेल्या मराठा समाजाच्या मोच्र्यामधून आता दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटीज् अ‍ॅक्ट) रद्द करण्याची मागणी जोरात पुढे येऊ  लागली आहे. हा मुद्दा सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी छेडला होता.

आगीत तेल ओतण्यास दलित नेत्यांचा नकार

मराठा समाजामधून कायदा रद्द करण्याची मागणी येऊ  लागल्यानंतर दलित समाजामध्ये अस्वस्थता वाढली आहे. तरीदेखील जातीय संवेदनशीलता लक्षात घेऊन दलित नेत्यांनी मराठा समाजाच्या मागणीला आक्रमक प्रत्युत्तर देण्याचेो टाळल्याचे दिसते आहे. वातावरण तापलेले असताना दुर्लक्ष करण्यात अधिक शहाणपणा असल्याचे मत एका दलित नेत्याने व्यक्त केले. दुसरीकडे मराठा व दलित यांच्यामधील तणाव दूर करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये मराठा-दलित ऐक्य परिषद आयोजित केली आहे.