अमेरिका आणि इराकी लष्कराच्या मदतीने दहशतवादी संघटना आयएसआयएसला त्यांच्या स्वयंघोषित राजधानी मोसूल शहरामधून बाहेर काढण्यात यश मिळेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला आहे. मोसूल शहराला दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी हजारो तरुण अभूतपूर्व हल्ला करण्यासाठी पुढे सरकत आहेत.

आम्ही अमेरिका, इटली आणि अन्य देशांच्या सहयोगातून मोसूल शहराला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यांचा उद्देश आयएसआयएसला मोसूल शहरातून बाहेर काढण्याचा आहे. मोसूल हे दहशतवाद्यांचे मुख्य केंद्र आहे.

आम्हाला ही लढाई जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. मात्र ही अतिशय अवघड लढाई आहे. यासाठी इराकी संघर्ष करीत आहेत. ते अतिशय आक्रमक पद्धतीने लढत असून त्यांच्याकडून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे, असे ओबामा यांनी म्हटले आहे.

या लढाईमध्ये अनेक चढउतार होणार आहेत. मात्र या लढाईमध्ये आम्ही जिंकण्याचा विश्वास आहे, असे ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या इटालियन पंतप्रधान मॅटिओ रेंजी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.