भारताने प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना दिलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सांगितले की, प्रजासत्ताकदिनी अमेरिकेचे अध्यत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ओबामा यांनी निमंत्रण स्वीकारल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना त्यांच्या प्रसिद्धी सचिवांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अध्यक्ष ओबामा हे जानेवारी २०१५ मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळण्यास उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान प्रथमच अमेरिकी अध्यक्षांना मिळत आहे. ओबामा यांच्या या भेटीने दोन्ही देशातील भागीदारी वृद्धिंगत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये दोन दिवस अमेरिकेत ओबामा यांची भेट घेतली होती.