केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केल्यानंतर आता विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात १६.५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्यांना आणखी एक धक्का दिला आहे.
गेले काही दिवस मोदी सरकार दर वाढीबाबत आक्रमक निर्णय घेत असून जनमतात दरवाढीविरोधात निदर्शने केली जात आहेत. रेल्वेभाडेवाढ केल्याच्या आठवड्याभरानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यात आले. आता सिलिंडरचे दर वाढवून ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तिसरा झटका दिला आहे. तर, विरोधकांकडून देशात ‘बुरे दिन’ येण्यास सुरूवात झाल्याची टीका होत आहे.
जनता रेल्वे भाडेवाढीचा निर्णय पचविण्याच्या प्रयत्नात असतानाच केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात १.६९ रुपयांची, तर डिझेलच्या दरात ५० पैशांची वाढ केली आणि आता विनाअनुदानित सिलिंडर्सच्या दरात १६.५० रुपयांची वाढ करून दरवाढीचा आणखी एक झटका दिला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.