जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरमध्ये गुरेज सेक्टर येथे पोहोचले आहेत. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदी प्रत्येकवर्षी दिवाळी सीमारेषेवर जवानांबरोबर साजरी करतात. ही प्रथा त्यांनी यंदाही कायम राखली. तत्पूर्वी सकाळी त्यांनी ट्विटरवरून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी २०१४ मध्ये सियाचिनमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. २०१५च्या दिवाळीत ते डोगराई वॉर मेमोरियल येथे गेले होते. तर गेल्यावर्षी हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथील चीन सीमेवर तैनात आयटीबीपीच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. यंदा ते उत्तर काश्मीरमधील गुरेज सेक्टर सीमारेषेजवळ १५ कॉर्प्सच्या जवानांबरोबर दिवाळी साजरा करणार आहेत.