मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रिन्सटन विद्यापीठातील एका प्राध्यापकाने घरचा अहेर दिला. ओबामा हे युद्ध गुन्हेगार असल्याची जळजळीत टीका प्राध्यापक कॉर्नल वेस्ट यांनी एका नभोवाणीवरील कार्यक्रमात केली.
कृष्णवर्णीय वेस्ट हे कठोर शब्दांत प्रहार करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. ते ओबामा यांचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जातात. अमेरिकेने गेल्या काही वर्षांत ज्या देशांमध्ये आपले सैनिक पाठवून युद्ध केले, तिथे आतापर्यंत २०० निष्पाप मुलांचा बळी गेला असल्याचे सांगून वेस्ट यांनी ओबामांची तुलना अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्याशी केली.
स्वातंत्र्याच्या नावाखाली निष्पाप लोकांचे बळी घेणारे निक्सन, बुश आणि ओबामा हे युद्ध गुन्हेगारच आहेत. त्यांनी कायद्याचे बेफिकीरपणे उल्लंघन केले असल्याचाही वेस्ट यांचा आरोप आहे.




















भारत काय किंवा अमेरिका काय,राजकारण्यांची जातकुळी एकचं ! घराणेशाही,पराकोटीचा स्वार्थ,संधिसाधूपणा ह्या बाबतीत सारे एकाचं माळेचे मणी.