भारतात मॅगीवर बंदी घालण्यात आल्याने इतर उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम होत असून त्यामुळे मॅगी परत आणणे हेच प्राधान्य असल्याचे नेस्ले इंडियाचे नवनियुक्त व्यवस्थापकीय प्रमुख सुरेश नारायणन यांनी म्हटले आहे. नारायणन म्हणाले की, कंपनीकडून विविध उत्पादने विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. मॅगी बंदीमुळे कंपनीच्या इतर उत्पादनांवर परिणाम झाला असून हे आव्हान परतवून लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मॅगी बाजारात परत आल्यावर आमचे काम अधिक सोपे होईल. नेस्लेच्या अधिकाऱ्यांना अधिकाधिक सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न आहे. नेस्ले हा भारताचा अविभाज्य घटक आहे. मागील १०० वर्षांपासून नेस्लेची विविध उत्पादने भारतात लोकप्रिय ठरली आहेत.