अमेरिकेतील सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयातील संरक्षण भिंतीवरून कोसळून चार वर्षांचा एक चिमुकला गोरिलाच्या तावडीत सापडला. या चमुकल्याला गोरिलाच्या तावडीतून वाचविण्यासाठी गोरिलाला बंदूकीतून गोळी मारून ठार मारण्यात आले. गोरीलाला ठार मारण्याच्या घटनेचा सर्वत्र विरोध होत आहे. प्राणिसंग्रहालयाच्या निर्णयाविरुध्द समाज माध्यमांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गोरीलाला ठार मारणे गरजे होते असे प्राणिसंग्रहालयामार्फत सांगण्यात येत आहे. ठार मारण्यात आलेल्या गोरिलाचे नाव हराम्बे असे होते. हराम्बेच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणावर लोक पुढे आले आहेत.
दोन हजाराहून अधिक लोकांनी ऑनलाईन अपिलावर स्वाक्षरी करत गोरिलाला ठार मारल्याबद्दल सिनसिनाटी पोलीस विभाग आणि प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. पालकांनी त्यांच्या लहान मुलाची नीट काळजी घ्यायला हवी होती असे लोकांचे म्हणणे आहे. मुलाच्या पालकांवर कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचा खुलासा रविवारी सिनसिनाट पोलिसांनी केला.
फेसबुकवर “Justice for Harambe” नावाने तयार करण्यात आलेल्या पेजला दुपारपर्यंत ४८०० हून अधिक लाईक मिळाले होते. #JusticeForHarambe हॅशटॅगचा वापर करत शेकडो संदेश टि्वटरवर पोस्ट करण्यात आले आहेत.

व्हिडिओ


सौजन्य : WATCH LIFE

व्हिडिओ


सौजन्य : Mark Word