लैंगिक छळाच्या आरोपप्रकरणी ‘वातावरण बदलविषयक आंतरराष्ट्रीय समिती’चे (आयपीसीसी) माजी अध्यक्ष आर. के. पचौरी यांना दिल्लीच्या  न्यायालयाने २७ मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. तथापि त्यांना ‘टेरी’च्या कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
‘टेरी’मध्ये काम करणाऱ्या एका संशोधक सहायिकेने पचौरी यांच्यावर आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. यामुळे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘आयपीसीसी’चा बुधवारी राजीनामा दिला. संयुक्त नोबेल पारितोषिक मिळालेले पचौरी यांना बुधवारी दिल्लीतील  रुग्णालयात हृदयरोगावरील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.