भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) विद्यमान गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर भाष्य केले आहे. राजन यांच्याकडे अर्थशास्त्राची पदवीही नव्हती. पण ते गर्व्हनर बनले. पण पटेल यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी केल्याने व त्यांच्याकडे कामाचा मोठा अनुभव असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.
स्वामी म्हणाले, राजन यांनी पहिल्यांदा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले नंतर व्यवस्थापनाची पदवी घेतली. नवे गर्व्हनर उर्जित पटेल यांच तसं नाही, त्यांनी अर्थशास्त्रामधून येल विद्यापीठातून पीएच.डी केली आहे. अनेक वर्षांपासून डेप्यूटी गर्व्हनर म्हणून त्यांनी काम केले असल्याने त्यांच्याकडे कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून देशातील आर्थिक विकासाबाबत अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही.
सुब्रमण्यम स्वामी यांनी पटेल यांचे कौतुक केले. राजन हे शिकागो येथे अर्थशास्त्राचे प्रोफसर म्हणून काम कार्यरत आहेत. आरबीआयच्या गर्व्हनरपदासाठी त्यांनी तेथे रजा घेतली होती. गर्व्हनरपदाच्या जबाबदारीवरून मुक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आवडत्या शैक्षणिक क्षेत्रात काम करणार असल्याचे त्यांनी नुकतेच म्हटले होते. त्यांच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही स्वागत केले होते. येत्या चार सप्टेंबर रोजी राजन यांचा कार्यकाळ संपणार आहे.
केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने उर्जित पटेल यांची नियुक्ती केली होती.