शहरातील नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत असून केंद्र सरकारने रंगपूर भागातील झोपडपट्ट्या हटविण्याचे काम सुरू केले आहे. बुलडोझर चालवायचा असेल तर आधी माझ्या अंगावरून पुढे न्यावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला दिला.
रंगपुर भागात प्रसासनाने वनभूमीवर तब्बल ९०० घरे हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. राहुल यांनी गुरूवारी रात्री रंगपुरमधील झुग्गी वस्तीला भेट दिली. नागरिकांनी राहुल गांधी यांच्यासमोर समस्यांचा पाढा रचला. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही येथे राहत असून आधारकार्ड, विजेचे बिलसुद्धा आमच्या नावार आहे तरीसुद्धा कारवाई करण्यात येत असल्याचे नागरिकांनी राहुल यांना सांगितले. यावेळी नागरिकांना विश्वास देताना, अशाप्रकारे नागरिकांना बेघर करणे चुकीचे असल्याचे म्हणत राहुल यांनी बुलढोझर चालवून वस्ती मोकळी करणार असाल तर, प्रथम माझ्या अंगावरून बुलडोझर चालवा असे आव्हान सरकारला केले.