अमेरिकेतील टेक्सास, ओक्लाहोमा व उत्तर मेक्सिकोमध्ये झालेल्या वादळी पावसाने कहर मांडला असून २० जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता झालेआहेत.
काही तासांमध्ये २५ सें.मी.चा पाऊस झाल्याने आलेल्या पूरामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून वाहनेही वाहून गेली आहेत. हा या दशकात झालेला सर्वात मोठा वादळी पाऊस असून यात लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

दहशतवादी हल्ल्यात केनियाचे १३ पोलीस बेपत्ता
कंपाला : केनियाच्या सीमावर्ती भागात अल-शबाब या सोमालियातील दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात केनियाचे १३ पोलीस अधिकारी बेपत्ता झाले असून ५ पोलीस जखमी झाले आहेत. मंगळवारी केनियाच्या पोलिसांची एक तुकडी त्यांच्या एका सहकाऱ्याकडून गहाळ झालेली बंदूक शोधण्यासाठी सीमेजवळ मोहीम राबवत होती. त्या वेळी अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणून पोलिसांची वाहने उडवून दिली. त्यानंतर पोलिसांवर गोळीबार केला.