काश्मीरमधील चिघळलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आता केंद्र सरकारने पडद्यामागच्या हालचालींना सुरूवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि काश्मीर खोऱ्यात लोकमान्यता असणाऱ्या मुस्लिम व्यक्तींमध्ये सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींशी चर्चा केली. आतापर्यंत या चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्यादृष्टीने काश्मीरी जनतेशी संवाद साधण्यासाठी राजनाथ सिंह यांनी या व्यक्तींकडे मदत मागितली आहे. या व्यक्तींमध्ये बहुतांशजण हे बिगरकाश्मिरी मुस्लिम असल्याचेही समजते. १८ ऑगस्टला राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात झालेल्या पहिल्या बैठकीला दहाजण उपस्थित होते. त्यानंतर रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीला १४ जण हजर होते. या दोन्ही बैठका गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने त्रिस्तरीय योजना आखल्याचे राजनाथ सिंह यांनी बैठकांदरम्यान सांगितले. यामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या तरूणांशी संवाद साधण्यावर मुख्य भर देण्यात येणार आहे. तसेच लष्कराकडून पेलेट गन्सचा वापर थांबविण्याचेही आश्वासनही यावेळी राजनाथ सिंह यांनी दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मते सद्यस्थितीत काश्मीरमधील परिस्थितीत कोणताही हस्तक्षेप न करता, जे घडत आहे ते घडू देणेच श्रेयस्कर आहे.
जाणीवपूर्वक , जिगरबाज की जुगार?
हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला होता. ४५ दिवस झाले तरीही तेथे संचारबंदी कायम आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट बनत चालली असून केंद्र सरकार अजूनही बघ्याचीच भूमिका घेत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
२०१९ मधील युद्धज्वराची नांदी?