भारताचे सरन्यायाधीश जे.एस.केहर यांनी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची शपथ दिली. कोविंद यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर लष्कराकडून २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी भाषण केले. भाषणात त्यांनी देशातील भवितव्याबाबत भाष्य केले. देशाचे ते दुसरे दलित राष्ट्रपती आहेत. यापूर्वी के.आर.नारायणन हे (१९९७-२००२) हे देशाचे पहिले दलित राष्ट्रपती होते.संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित शपथ ग्रहण सोहळ्यात मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, देवेगौडा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय मंत्री व विविध राज्यातील मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

तत्पूर्वी, कोविंद हे प्रणव मुखर्जींबरोबर राष्ट्रपती भवनपासून संसदेपर्यंत बग्गीत गेले. सरन्यायाधीश केहर, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारीही सेंट्रल हॉलला जाताना त्यांच्याबरोबर होते.

LIVE UPDATES:

राष्ट्रपती भवनाकडे रामनाथ कोविंद रवाना

भाषणानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.

उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्याकडून राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणाचे इंग्रजीमधून वाचन सुरू

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण सुरू

शपथ घेतल्यानंतर २१ तोफांची सलामी

सरन्यायाधीश जे.एस.केहर यांनी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची शपथ दिली.

मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह रामनाथ कोविंद संसदेत पोहोचले

कोविंद यांनी मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली

रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती भवनात पोहोचले.

शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी सर्व राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्र्यांना निमंत्रण

शपथविधी सोहळ्यात कोविंद यांचे नातेवाईकही सहभागी

रामनाथ कोविंद यांच्याकडून महात्मा गांधींना श्रद्धांजली

रामनाथ कोविंद हे पत्नी सविता यांच्यासह राजघाटकडे रवाना

भारताचे सरन्यायाधीश न्या. केहर देणार शपथ

शपथ ग्रहण केल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये नूतन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण होईल.

लष्कराच्या तिन्ही दलांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिले जाईल.