मेरठ जिल्ह्य़ातील बेगमपूर येथून एका २२ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिला डांबून ठेवण्याचा आणि तिच्यावर सतत दहा दिवस बलात्कार करण्याचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित महिलेने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ही घटना उजेडात आली. पतीविरुद्ध महिला पोलीस ठाण्यावर तक्रार नोंदविण्यासाठी जात असताना बेगमपूर येथून एहसान नावाच्या व्यक्तीने आपले अपहरण केले आणि एका अज्ञातस्थळी आपल्याला डांबून ठेवले आणि दहा दिवस आपल्यावर बलात्कार केला, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर गुरुवारी एहसानने आपल्याला बिनौली येथील जंगलात फेकले आणि तो पसार झाला, असे महिलेने पोलिसांना सांगितले. सदर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.