सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीवर रविवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर दु:खावेग सहन न होऊन तिची आई कोसळली. यानंतर लगेचच त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
आपल्या मुलीच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने त्यांना चक्कर आली, इथे दाखल केल्यानंतर आम्ही त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी केली. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही, मात्र मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलीच्या काळजीपोटी त्यांनी गेले १०-१२ दिवस पुरेसे जेवण न घेतल्याने त्यांना कमालीचा अशक्तपणा आल्याचे दिसून आले, असे डॉक्टरांनी सांगितले.