पाकिस्तानात अस्थिरता माजविण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवाद्यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी केला आहे.
दहशतवादाला दहशतवादानेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केल्यानंतर ख्वाजा आसिफ यांचे वक्तव्य पाकिस्तान नभोवाणीने दिले आहे.
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही बंदी घालण्यात आलेली संघटना पाकिस्तानविरुद्ध छुपे युद्ध लढत आहे, बलुचिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा सहभाग आहे, असा कांगावाही आसिफ यांनी केला आहे.