१९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनच्या फाशीवर अंतिम निर्णय होताच सर्वोच्च न्यायालयातील साहाय्यक रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी पदत्याग केला.
याकूबवरील निर्णयासाठी पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी घेण्यात आली होती. या वेळी याकूबला फाशी द्यावी की नाही यावरून बराच वेळ चर्चा झाली. अखेर ३० जुलै रोजी याकूबची फाशी निश्चित होताच सुरेंद्रनाथ यांनी पदत्याग केला. १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा सूड घेण्यासाठीच याकूबला फासावर चढविण्यात आले असे मत असलेल्या सुरेंद्रनाथ यांना न्यायालयाने सेवेतून मुक्त केले.