प्रथिनांचा समावेश असलेली तांदळाची प्रजात इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयाने विकसित केली असून त्याचा उपयोग मुलांना पोषक आहार मिळवून देण्यासाठी होणार आहे. छत्तीसगडमधील आदिवासी भागात कुपोषण मोठय़ा प्रमाणात आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाचे वनस्पती रेणवीय जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. गिरीश चंडेल यांनी सांगितले की, आमच्या संशोधकांनी सात वर्षे मेहनत करून भाताची प्रथिनयुक्त प्रजाती तयार केली आहे. मुलांमध्ये असलेली प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी तांदळाच्या या प्रजातीचा वापर केला जाणार आहे.

भात हे राज्यातील लोकांचे पूरक अन्न असून त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. आम्ही सूक्ष्मपोषके व प्रथिनांचा समावेश तांदळाच्या प्रजातीत केला आहे. आपल्याकडे सध्या ज्या तांदळाच्या प्रजाती उपलब्ध आहेत त्या प्रथिनयुक्त नाहीत, त्यामुळे त्यात कबरेदकेच असतात. प्रथिने व

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

जस्त यांचे पुरेसे प्रमाण असलेली तांदळाची प्रजात तयार करण्यात आली आहे.

नव्याने विकसित करण्यात आलेली तांदळाची प्रजाती प्रथिनयुक्त असून त्यात १० टक्के प्रथिने आहेत. नेहमीच्या तांदळाच्या प्रजातीत ३ टक्के प्रथिनांचा समावेश असतो. नवीन प्रजातीत जस्ताचे प्रमाण ३० पीपीएम आहे.  छत्तीसगडच्या आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण गेल्यावर्षी जास्त दिसून आले होते व ती मुले वजनाने कमी असल्याचे लक्षात आले होते. बस्तर, दंतेवाडा व कोंडगाव तसेच नारायणपूर या जिल्ह्य़ातील पाच लाख बालकांचे वजन अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे.

इतर जिल्ह्य़ांपेक्षा तेथे कुपोषणाचे प्रमाणही अधिक आहे. मुलांचे वजन वाढण्यासाठी ‘वजन त्योहार’ योजना आखण्यात आली असून मुलांसाठी पोषक आहार आठवडा साजरा केला जाणार आहे.