अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड राहुल वर्मा यांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सिनेट समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. जर वर्मा यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील मिळाला तर ते भारतातील पहिले भारतीय वंशाचे अमेरिकन राजदूत ठरतील.
नॅन्सी पॉवेल यांच्या जागी वर्मा यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या वर्षांच्या सुरुवातीलाच पॉवेल यांनी पदाचा राजीनामा दिला होता. सध्या कॅथलिन स्टिफन हे भारतातील अमेरिकी दूतावासाचे पथक प्रमुख आहेत.