23 September 2017

News Flash

गजब है रे भाई….इतना मत हँसाओ!; लालूप्रसादांनी उडवली मोदींची खिल्ली

उत्तर प्रदेशातील वक्तव्यावरून टोलेबाजी

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: February 21, 2017 5:27 PM

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

मी उत्तर प्रदेशचा दत्तक मुलगा आहे, असे वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी खिल्ली उडवली आहे. ‘पंजाब में खून का बेटा और उत्तर प्रदेश में दत्तक पुत्र! गजब है रे भाई..इतना मत हंसाओ!’ असे ट्विट करून लालूप्रसाद यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी उत्तर प्रदेशातील हरदोई येथे प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी माझा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. उत्तर प्रदेशने मला दत्तक घेतले. ही माझी कर्मभूमी आहे. उत्तर प्रदेशचा विकास मीच करेन, असे त्यांनी सांगितले होते. दत्तक मुलगाही आई-वडिलांची काळजी घेणार आणि येथील परिस्थिती बदलण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडणार आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला तुमचा आशिर्वाद हवा आहे. बहुमत देऊन उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन करा, असे आवाहन मोदींनी जनतेला केले होते. पंतप्रधान मोदींच्या याच वक्तव्यावर लालूप्रसाद यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. ‘पंजाब में खून का बेटा और उत्तर प्रदेश में दत्तक पुत्र! गजब है रे भाई..इतना मत हंसाओ!’ असे ट्विट लालूप्रसाद यांनी केले आहे.

यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. मोदींच्या विदेश दौऱ्यांवरून त्यांनी टोलेबाजी केली होती. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर ‘मोदी हे एनआरआय (अनिवासी भारतीय) बनले आहेत’, अशी कोपरखळी त्यांनी मारली होती. मोदींसाठी ‘जगाचे पंतप्रधान’ असे पद तयार करावे, असे आवाहन त्यांनी जगभरातील नेत्यांना केले होते. मोदी या देशाचे (भारत) पंतप्रधान आहेत, मात्र सर्वाधिक काळ ते देशाबाहेरच असतात. मोदींसाठी ‘जगाचे पंतप्रधान’ असे पद निर्माण करावे, असे आवाहन मी जगभरातील नेत्यांना करतो, असे ते म्हणाले होते. त्याआधी लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर अनेक वेळा टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुर्नजन्म घेतला असून आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावू, अशी ‘जहरी’ टीका त्यांनी मोदींवर केली होती.

First Published on February 17, 2017 5:21 pm

Web Title: rjd chief laluprasad yadav funny comment on pm narendra modi
 1. R
  Ramdas Bhamare
  Feb 19, 2017 at 11:52 am
  मोदींच्या रूपाने भाजपाला बहुभाषिक , बहुराज्यीय आणि बहुराष्ट्रीय पंतप्रधान मिळाला आहे .
  Reply
  1. R
   Raaj
   Feb 17, 2017 at 4:58 pm
   मोदींना जनतेने संपूर्ण भारताचा विकास करण्यासाठी पंतप्रधानासारखे अत्त्योच्च जबाबदारीचे स्थान दिले पण ते सोडून मोदी आता गावचा पाटील बनण्यासाठी सुद्धा उत्सुक होतील. मोदीजी, नाटके बंद करून पहिली जनतेला दिलीत ती आश्वासने पूर्ण करा
   Reply
   1. विनोद
    Feb 17, 2017 at 4:51 pm
    ख्या ख्या ख्याख्या !
    Reply