23 September 2017

News Flash

कोणी काय खावे हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व नव्हे – मोहन भागवत

सरसंघचालकांचे महत्त्वपूर्ण विधान

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 10:41 AM

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत.

कोणी काय खावे आणि कोणाचा पेहराव कसा असावा, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व होत नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ‘कोणी काय खावे, कोणी काय परिधान करावे, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व नाही. तर इतरांना ते जसे आहेत, तसे स्वीकारणे म्हणजे हिंदुत्व आहे,’ असे भागवत यांनी म्हटले. सरसंघचालकांचे हे विधान सध्याच्या परिस्थितीत अतिशय महत्त्वाचे आहे. गोमांस बाळगल्याच्या, गोमांस सेवन केल्याच्या संशयावरुन उजव्या संघटनांकडून विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जात असताना भागवत यांनी हे विधान केले आहे.

मोहन भागवत यांनी ५० देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी देशातील विविध घटनांवर त्यांनी भाष्य केले. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवरदेखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘सोशल मीडियावर ट्रोल करताना कमरेखाली टीका केली जाते. या कृतीचे समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत नाही,’ असे त्यांनी म्हटले. ‘संघ आणि भाजप एकमेकांशी संवाद साधतात. मात्र संघ आणि भाजपची निर्णय प्रक्रिया स्वतंत्र आहे’, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

भाजपचे सचिव राम माधव यांच्या इंडिया फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मोहन भागवत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी संघाकडून चालणाऱ्या कामांची माहिती राजनैतिक अधिकाऱ्यांना दिली. यावेळी भागवत यांनी उपस्थितांना हिंदुत्वाच्या मुद्यावर संबोधित केले. ‘कोणी काय खावे, कोणी काय परिधान करावे, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व नाही. एखाद्या व्यक्तीला तो जसा आहे, तसा स्वीकारणे म्हणजे हिंदुत्व आहे,’ असे त्यांनी म्हटले.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसारख्या कडव्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून गोवंश सुरक्षेचा मुद्दा अतिशय आक्रमकपणे हाताळला जात आहे. गोमांस वाहतूक, गोमांस सेवन, गोमांस बाळगल्याच्या केवळ संशयावरुन उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून विशिष्ट समुदायातील लोकांवर हल्ले केले जात आहेत. या संघटनांना संघाचे समर्थन असल्याची टीका देशभरातून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भागवत यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

First Published on September 13, 2017 10:41 am

Web Title: rss chief mohan bhagwat says hinduness isnt about what one wears or eats
 1. M
  md
  Sep 13, 2017 at 4:05 pm
  ५० देशांचे अधिकारी होते ना मग असेच बोलावे लागते,
  Reply
  1. मी
   Sep 13, 2017 at 2:26 pm
   bola taisa chaale tyachi vandavi paule...
   Reply
   1. M
    Milind
    Sep 13, 2017 at 1:15 pm
    हिंदूतालिबानी गोरक्षकांचा जमाव जेव्हा निरपराध लोकांना मारत होता तेव्हा हे टीकोजीराव कुठे वाळूत तोंड खुपसून पडले होते? गुजरातमध्ये जेव्हा हिंदू दलितांवर हिंदू तालिबानी लोकांनी हल्ले केले तेव्हा हा ढोंगी संघ कोणत्या बिळात लपून बसलेला? जेव्हा हिंदू दलितांवर अत्याचार होतात तेव्हा संघ काठ्या आपटत किमान त्यांचे संरक्षण करताना आजवर का दिसला नाही? नेमकं हिंदू हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणीधर्म ब्राह्मण लोकांचे हित आणि संरक्षण असेच ना? बहुजन समाजाची किती काळ हिंदू धर्माच्या नावाखाली फसवणूक करणार?
    Reply
    1. R
     Rajesh
     Sep 13, 2017 at 1:04 pm
     संघीय लोक जसे बोलतील तसे कृती करतील याबाबत खात्री नाही कारण वेळ पाहून खेळ करण्याची यांची वृत्ती आहे . आणि हो हिंदु धर्म काय वगैरे याची शिकवण संघाकडून आम्हाला घ्यायची वेळ कधीही येणार नाहि.
     Reply
     1. P
      pritam lade
      Sep 13, 2017 at 12:30 pm
      स्वामी विवेकानंद कधी कोणत्या देवाची पूजा करताना वाचनात आले नाही.
      Reply
      1. P
       pritam lade
       Sep 13, 2017 at 12:27 pm
       देवा धर्माची भीती दाखवून दक्षिण घेऊन लुटणारे! हिंदू धर्म चांगला आहे, त्याला चांगलं राहू द्या!
       Reply
       1. P
        Prasad
        Sep 13, 2017 at 12:11 pm
        मग हे तुमच्या कार्यकर्त्याना सांगा की राव . खा की च ड्डी प ह न ते र हो
        Reply
        1. P
         pritam lade
         Sep 13, 2017 at 12:09 pm
         कायले हिंदुत्वाची आग लावावी लागते. म्हणूनच आजकाल लोक भारताला पाकिस्तान म्हणून राहिले ते या आगलाव्या लोकांमुळे. देवा धर्माच्या नावाखाली दक्षिण वसूल करून साम्राज्य चालवीत आहात. एक दिवस भांडा फ़ुटेलच डेरा सच्चा सौदा सारखा! हिंदुत्व, इस्लामीकरण, बुधिस्टकरण लावा देशाला आग!
         Reply
         1. N
          NITIN
          Sep 13, 2017 at 12:03 pm
          गांधी नको राजे शिवाजी हवे!! भारताच्या नोट-वर!! तरच तरुणाना प्रेरणा मिळेल!! पाक-चीनला धडकी भरेल!! महात्मा?? गांधी साहेब हे एक वैचारिक अतिरेकी होते !! यात शंका नाही. स्वतंत्र-नंतर पाकिस्तान-विरुद्ध, निजाम-विरुद्ध, गांधी-जिचे शिष्योत्तम नेहरू-पटेल यांनी सशस्त्र सेने वापरली !! अ-हिंसा तत्व नव्हे !! हिंदी-चिनी भाई भाई फसल्यावर चीनने भारतावर १९६१ मध्ये चक्क हल्ला केला!! तेंव्हा तर नेहरू सायबाचा बोबडीच वळली?? असो. थोर गांधीने भारतात लोकशाहीचा सर्व-प्रथम निर्घृण खून केला?? १९३७-३८ मध्ये नेताजी-सुभाष बाबू गांधीच्या उमेदवाराला हरवून बहुमताने निवडून आले होते !! पण गांधीने अ- कार पुकारला, आणि नेताजींना राजीनामा देण्यास भाग पाडले !! तीच पद्धत पुढे दिल्लीने राज्यांच्या मुख्यमंत्रांविरुद्ध वापरली !! तरी नथुरामने गांधींना मारले हि फार मोठी चूक केली?? त्यामुळे गांधी हुतात्मा झाले आणि त्यांचे महत्व अति वाढले !! त्यांच्या गंभीर घोड-चुका कोणी लक्षात घेत नाही?? मुस्लिम-दलित यांचे अतिरेकी लांगुन-चलन हि तर फार फार मोठ्ठी चूक.. त्यामुळे सामान नागरी कायदा झाला नाही? मुस्लिम महिलांवर घोर अन्याय झाला. आता तर
          Reply
          1. D
           deepak bansode
           Sep 13, 2017 at 12:02 pm
           Sangh bolto ek ... Karto ...karayala lavato ek ....
           Reply
           1. V
            Vijay
            Sep 13, 2017 at 11:51 am
            दहा तोंडाचा रावण जर आज जिवंत असता तर त्याने स्वतः च्या हाताने दहाही तोंडांना गळफास लावून घेतला असता
            Reply
            1. Y
             yug
             Sep 13, 2017 at 11:34 am
             आता संघविरोधी धूर्त डावपेच आणि राजकारण करणारे भेकड काहीतरी वेगळा विचार करून भुंकतंच राहतील .
             Reply
             1. विनोद
              Sep 13, 2017 at 11:12 am
              दाखवायचे दात वेगळे आणी खायचे वेगळे. दहा ताेंडाच्या रावणास खलनायक म्हणायचे आणी स्वतः दहा ताेंडानी एकाच विषयी दहा वेगवेगळी भिन्न मते मांडून वैचारिक गाेंधळ माजवून द्यायचा.
              Reply
              1. V
               Vijay
               Sep 13, 2017 at 10:54 am
               मत भागवत जी उद्या तुम्ही संघी लोक गोबर खाता आणि गोमूत्र पिता म्हणजे तुम्ही सगळ्या देशाला गोबर खायला नाही लावू शकत आम्हाला अक्कल आहे भक्तांची गोष्ट वेगळी
               Reply
               1. Load More Comments