जाती आणि धर्माच्या नावावर संघ परिवार देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून अफवा पसरवून संघ जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करीत असल्यानेच आपण संघमुक्त भारताचे आवाहन केले, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

सर्व बिगर भाजप पक्षांनी एकत्रित येऊन संघ परिवाराशी वैचारिक आणि राजकीय लढा द्यावा, असे आवाहन अलीकडेच नितीशकुमार यांनी केले होते.

पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधातील प्रस्तावित आघाडीचे नेतृत्व कोण करणार, असे विचारले असता नितीशकुमार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. आमच्याकडे अनेक सक्षम नेते आहेत, सध्या नेतृत्वाचा प्रश्न आमच्यासमोर नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेस, डावे पक्ष आणि प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन भाजप आणि संघ परिवाराविरोधात शक्य तितकी मोठी आघाडी स्थापन करण्याची कल्पना नितीशकुमार यांनी सोमवारी पुन्हा एकदा मांडली.केरळमधील प्रचारासाठी

मोदी, शहा यांच्या सभा

तिरुअनंतपूरम: केरळमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या राज्यभरातसभा घेण्याचे ठरविले आहे. भाजपने २५ एप्रिलपासून बडय़ा नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. मोदी आणि शहा यांच्यासह सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह यांच्याही सभा होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.