राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ख्रिश्चन नेत्यांची बठक घेऊन त्यांची एक संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संघाने दशकभरापूर्वी मुस्लिमांची मुस्लीम राष्ट्रीय मंच ही संघटना स्थापन केली होती, त्याच धर्तीवर ख्रिश्चनांची संघटना उभारण्यात येत आहे. या संघटनेचे नाव निश्चित झाले नसले तरी राष्ट्रीय इसाई मंच असे त्यांचे नाव ठेवले जाणार आहे.
ख्रिश्चन समुदायाला आपलेसे करून घेण्याचा रा.स्व. संघाचा हा प्रयत्न आहे. १७ डिसेंबरला ख्रिश्चन समुदायातील नेत्यांची बठक घेण्यात आली, त्या वेळी ४-५ आर्चबिशप, ४०-५० रेव्हरंड बिशप १० ते १२ राज्यांतून आले होते व अशी संघटना स्थापन करण्याचे ठरवण्यात आले आहे. संघटना स्थापन करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे रा.स्व.संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी सांगितले. ख्रिश्चन समुदायापर्यंत धर्मगुरूंच्या माध्यमातून पोहोचण्याचा संघाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. १७ डिसेंबरला नवी दिल्लीत झालेल्या बठकीच्या अध्यक्षस्थानी इंद्रेशकुमार होते, तसेच विश्व िहदू परिषदेचे चिन्मयानंद स्वामी यांची हजेरी होती. आर्चबिशप मार कुरियाकोस भरणीकुलंगरा, बिशप जेकब मार बार्नबस, बिशप आयझ्ॉक ऑस्थॅशियस, अल्वान मसी हे या वेळी ख्रिश्चन समुदायाच्या वतीने उपस्थित होते. संघाच्या धर्म जागरण मंचाने आग्रा येथे फेरधर्मातराचा कार्यक्रम ठेवला होता, पण राजकीय प्रतिक्रियांमुळे तो रद्द करण्यात आला. मोदी सरकारनेच संघाला हा कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले होते. अलीकडेच दिल्लीत चच्रेसवर हल्ले झाले होते, त्यामुळे ख्रिश्चन समाज भाजपपासून दूर चालला होता. आता या नवीन प्रयत्नांमुळे त्यावर मलमपट्टी होण्याची शक्यता आहे. अलीकडेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ख्रिसमसनिमित्त कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले होते व ख्रिश्चनांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ख्रिश्चन धर्मगुरू व व्यावसायिकांना बोलावून त्यांचे स्वागत केले होते, त्या वेळी काíडनल ओस्वाल ग्रॅशियस उपस्थित होते.